माजी टेनिसपटू लिएंडर पेसला 'एक्स' श्रेणीची सुरक्षा प्रदान
नवी दिल्ली, 06 एप्रिल (हिं.स.)पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या माजी टेनिसपटू लिएंडर पेसला केंद्रीय गृह मंत्रालयाने ''एक्स'' श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. आता पेसच्या संरक्षणासाठी सीआयएसएफचे जवान तैनात केल
टेनिस दिग्गज लिअँडर पेसचा भाजपमध्ये प्रवेश


नवी दिल्ली, 06 एप्रिल (हिं.स.)पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात सामील झालेल्या माजी टेनिसपटू लिएंडर पेसला केंद्रीय गृह मंत्रालयाने 'एक्स' श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. आता पेसच्या संरक्षणासाठी सीआयएसएफचे जवान तैनात केले जातील.

लिएंडर पेस हे भारतीय टेनिसमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असून ते देशभरात लोकप्रिय आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ते महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे. त्यांना प्रचारासाठी राज्यभर प्रवास करावा लागू शकतो. त्यांच्या सुरक्षेच्या चिंतेचे मूल्यांकन केल्यानंतर, गृह मंत्रालयाने त्यांना 'एक्स' श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

'एक्स' श्रेणीच्या सुरक्षेमध्ये कमांडोंना वगळून दोन सशस्त्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाचा समावेश असतो. लिएंडर पेस अलीकडेच भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर पेस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर लिएंडर पेस म्हणाले की, मोदीजींनी त्यांना आमंत्रित करून एक बंगाली म्हणून त्यांचा सन्मान केला आणि युवा व क्रीडा क्षेत्रासाठीची त्यांची दूरदृष्टीही सांगितली. आज मी ते ध्येय पुढे नेण्यासाठी येथे आहे.

पेसने म्हटले होते की, पंतप्रधान मोदींनी २०३६ च्या ऑलिम्पिकच्या तयारीमध्ये त्याच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्याला देशाची सेवा करण्याची तीव्र इच्छा आहे आणि तो प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊन देशासाठी काम करण्यास तयार आहे.

ऑलिम्पिकमध्ये एकेरी प्रकारात देशासाठी पदक जिंकणारा लिएंडर पेस हा एकमेव भारतीय टेनिसपटू आहे. पेसने १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. पेसने दुहेरी आणि मिश्र दुहेरीसह १८ ग्रँडस्लॅम विजेतेपदेही जिंकली आहेत.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande