आयपीएल २०२६: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या प्रयत्नात
गुवाहाटी, 06 एप्रिल (हिं.स.)आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी दोन संघ आमनेसामने येतील जे बरेच संतुलित दिसत आहेत. फॉर्मात असलेला राजस्थान रॉयल्स पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे. राजस्थान विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत असेल, तर मु
हार्दिक पंड्या


गुवाहाटी, 06 एप्रिल (हिं.स.)आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी दोन संघ आमनेसामने येतील जे बरेच संतुलित दिसत आहेत. फॉर्मात असलेला राजस्थान रॉयल्स पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे. राजस्थान विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत असेल, तर मुंबई पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्यास उत्सुक आहे.

मुंबईच्या फलंदाजीची धुरा रोहित शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्यावर असणार आहे. तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे गोलंदाज आहेत. राजस्थानच्या संघात वैभव सूर्यवंशीची आक्रमक फलंदाजी असून, यशस्वी जैस्वालसारखे उत्कृष्ट फलंदाज आणि रियान पराग, ध्रुव जुरेल व शिमरॉन हेटमायरसारखे फिनिशर्स आहेत. गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि रवी बिश्नोई संघाला अधिक मजबूत करतात.

मुंबई आपला मागील सामना हरली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पांड्या आजारपणामुळे खेळला नाही. पहिल्या सामन्यात अंतिम ११ क्रिकेटपटूंध्ये स्थान न मिळालेल्या आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरल्या गेलेल्या सूर्यकुमार यादवने त्याच्या जागी संघाचे नेतृत्व केले. पांड्या पुढच्या सामन्यात संघात परत येऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर मुंबईने प्रथम फलंदाजी केली, तर सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागू शकते.

दुसऱ्या डावात त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवले जाऊ शकते. जर मुंबईने प्रथम गोलंदाजी केली, तर फलंदाजीला अधिक मजबुती देण्यासाठी जसप्रीत बुमराह किंवा ट्रेंट बोल्ट यांना वगळले जाऊ शकते आणि नंतर त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरले जाऊ शकते. बाकीचा संघ तसाच राहण्याची शक्यता आहे.

राजस्थान संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात त्यांनी ज्या प्रकारे गुजरात टायटन्सला पराभूत केले ते अभूतपूर्व होते. या संघाच्या फलंदाजी फळीतील सर्वात मोठे नाव वैभव सूर्यवंशी आहे. हा १५ वर्षीय फलंदाज, जर फॉर्मात आला, तर कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाची धुलाई करू शकतो. तो जसप्रीत बुमराहचा सामना कसा करतो हे पाहणे बाकी आहे. संघाच्या फलंदाजीत फारसा बदल अपेक्षित नाही.

कर्णधार रियान पराग मागील सामन्याप्रमाणेच संघ मैदानात उतरवू शकतो. जर संघाने प्रथम फलंदाजी केली, तर गुजरातविरुद्ध घडल्याप्रमाणे रवी बिश्नोईला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणि डोनोव्हान फरेराला त्याच्या जागी संधी दिली जाऊ शकते. जर राजस्थानने प्रथम फलंदाजी केली, तर बिश्नोईची अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये निवड निश्चित आहे, तर फरेराला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी दिली जाऊ शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande