खालापूरमध्ये डिजिटल छळ प्रकरण; आरोपीविरुद्ध गुन्हा
रायगड, 07 एप्रिल, (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेला मोबाईलवरून वारंवार संपर्क साधत व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प
Digital harassment case in Khalapur; Case registered against accused


रायगड, 07 एप्रिल, (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेला मोबाईलवरून वारंवार संपर्क साधत व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० या कालावधीत मौजे खालापूर येथील श्री. दळवी यांच्या कार्यालय परिसरात तसेच पहल नर्सिंग लाईव्हस समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. आरोपी (रा. सुधागड, ता. पाली) याने महिला फिर्यादी (रा. निंबोडे, ता. खालापूर) हिच्याशी जवळीक निर्माण करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी मोबाईलवर संपर्क साधला.

यानंतर आरोपीने व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करत फिर्यादीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे फिर्यादीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम ६७ तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम ७८(२) व ७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande