रत्नागिरी : टाळसुरे येथे दोन दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी
रत्नागिरी, 9 एप्रिल, (हिं. स.) : टाळसुरे (ता. दापोली) येथे आज सकाळी दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत दोन स्वार जखमी झाले. आज सकाळी ११च्या सुमारास विलास मुरलीधर मयेकर (वय ५०, लाडघर, ता. दापोली) हे लाडघर ग्रामपंचायतीतील शिपाई दुचाकीने खेडकडे निघाले हो
रत्नागिरी : टाळसुरे येथे दोन दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी


रत्नागिरी, 9 एप्रिल, (हिं. स.) : टाळसुरे (ता. दापोली) येथे आज सकाळी दोन दुचाकींच्या झालेल्या धडकेत दोन स्वार जखमी झाले.

आज सकाळी ११च्या सुमारास विलास मुरलीधर मयेकर (वय ५०, लाडघर, ता. दापोली) हे लाडघर ग्रामपंचायतीतील शिपाई दुचाकीने खेडकडे निघाले होते. टाळसुरे येथे मोकल बागेजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीशी समोरासमोर धडक झाली. अपघातात दोन्ही स्वारांना दुखापत झाली असून प्रथमोपचाराकरिता मयेकर यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दुसऱ्या स्वाराला खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande