
कोल्हापूर, 09 एप्रिल (हिं.स.)। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे बालरोगशास्त्र विभागात GBS हा गंभीर आजार झालेमुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण कु.आर्यन भगवान म्हातूगडे वय वर्षे 12, रा.सावर्डे, ता. भुदरगड , जि.कोल्हापूर. या रुग्णास 31 जानेवारी रोजी बालरोगशास्त्र विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. सदर रुग्ण गंभीर असल्यामुळे त्याला बालरोगशास्त्र विभागातील डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले.
सदर रुग्णावर IVIG इंजेक्शन सुरू करण्यात आली. बालरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रुग्णावर यशस्वीरित्या उपचार सुरू करण्यात आले. सदर उपचारादरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर रुग्णावर करण्यात आलेले सर्व उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले आहेत.
यावेळी रुग्णाचे पालक भगवान म्हातुगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझ्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बालरोगशास्त्र विभागातील सर्वच डॉक्टरांनी खूप परिश्रम घेतले तसेच अहोरात्र सर्व डॉक्टरांनी प्रयत्न करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले असल्याचे सांगितले. बालरोगशास्त्र विभागातील सर्व स्टाफच्या या परिश्रमामुळेच माझ्या मुलाला मी आज सुखरूप घरी घेऊन जात असल्याबद्दलचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
सदर रुग्णास दिनांक 08/04/2026 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ.संगीता कुंभोजकर, वैद्यकीय अधीक्षक, डॉ.भूषण मिरजे, सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ.महेश्वरी जाधव, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, इन्चार्ज सिस्टर सौ.मीना पंडित, सौ.मीना डिसूजा तसेच विभागातील सर्व नर्सिंग स्टाफ समाजसेवा अधीक्षक श्री.अजित भास्कर रुग्णालयाकडून सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar