रत्नागिरी : ज्येष्ठ समाजसेवक हभप नारायण ठसाळे यांचे निधन
रत्नागिरी, 1 मे, (हिं. स.) : धामेली भोजनेवाडी (ता. चिपळूण) येथील ज्येष्ठ समाजसेवक, कीर्तनकार तसेच महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे माजी विश्वस्त हभप नारायण सखाराम ठसाळे यांचे आज पहाटे निधन झाले. ठसाळे यांनी आयुष्यभर सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक
नारायण ठसाळे


रत्नागिरी, 1 मे, (हिं. स.) : धामेली भोजनेवाडी (ता. चिपळूण) येथील ज्येष्ठ समाजसेवक, कीर्तनकार तसेच महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे माजी विश्वस्त हभप नारायण सखाराम ठसाळे यांचे आज पहाटे निधन झाले.

ठसाळे यांनी आयुष्यभर सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू आणि वंचित घटकांना मदत केली. कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या साध्या, मनमिळाऊ आणि सेवाभावी स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात आपले स्थान निर्माण करून गेले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande