खारपाडा-जिते मार्गावर हिट अँड रन; अॅक्टीव्हा चालकाचा जागीच मृत्यू
रायगड, 12 मे (हिं.स.)। पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अॅक्टीव्हा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात दादर (सागरी) पोलीस ठाणे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मयत इसम हा
खारपाडा-जिते मार्गावर हिट अँड रन; अॅक्टीव्हा चालकाचा जागीच मृत्यू


रायगड, 12 मे (हिं.स.)। पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अॅक्टीव्हा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात दादर (सागरी) पोलीस ठाणे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत इसम हा त्याच्या ताब्यातील होंडा अॅक्टीव्हा (क्र. एमएच 46 सीझेड 5945) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत होता. खारपाडा ते जिते गावादरम्यान असलेल्या आरटीओ तपासणी केंद्रासमोर पोहोचताच एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत अॅक्टीव्हाला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत अॅक्टीव्हा चालकाच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी दादर (सागरी) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 34/2026 नोंद करण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 184, 122 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(A), 125(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सकपाळ करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande