
सोलापूर, 13 मे (हिं.स.)।
सोलापूर पोलीस यांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपये किमतीचे एमडी मेफेड्रॉन जप्त केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून मोठ्या प्रमाणात एमडी मेफेड्रॉन हस्तगत केले असून, संबंधित संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोलापूर शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, आगामी काळातही अशाच प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड