अमेरिकेच्या अप्रामाणिकपणामुळे युद्ध पूर्ण संपवण्यात अडथळे - अब्बास अराघची
तेहरान, 13 मे (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर टीका केली. वॉशिंग्टनच्या कृतींमुळे विश्वास कमी झाला असून, शांतता प्रस्थापित होण्यामधील हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे त्यांनी म्हटले. तेहरानमध्ये नॉर्वेच्या उप-परराष्ट्रमंत्
अमेरिकेच्या अप्रामाणिकपणामुळे युद्ध पूर्ण संपवण्यात अडथळे निर्माण होत आहे- अब्बास अराघची


तेहरान, 13 मे (हिं.स.)।इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर टीका केली. वॉशिंग्टनच्या कृतींमुळे विश्वास कमी झाला असून, शांतता प्रस्थापित होण्यामधील हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे त्यांनी म्हटले. तेहरानमध्ये नॉर्वेच्या उप-परराष्ट्रमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान अराघची यांनी हे वक्तव्य केले. इराणी सरकारी प्रसारमाध्यमांनी याबाबत माहिती दिली.

वृत्तानुसार, अराघची यांनी अमेरिकेच्या कथित अहंकारी भूमिकेवर तसेच धमकीपूर्ण आणि भडकाऊ भाषेवर टीका केली. अमेरिकेच्या हेतूंमध्ये प्रामाणिकपणाचा अभाव आणि अप्रामाणिकपणा असल्यामुळेच युद्ध पूर्णपणे संपवण्यात अडथळे निर्मान होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेले लष्करी हल्ले हे सध्याच्या परिस्थितीचे आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाचे मुख्य कारण आहेत.

अराघची यांनी पुढे सांगितले की, इराणच्या समुद्री बंदरांची सातत्याने नाकेबंदी करून अनेक वेळा युद्धविरामाचे उल्लंघन करण्यात आले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीलगतचा देश म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार तेथील व्यवस्था आणि नियम निश्चित करण्यासाठी इराण विचारविनिमय करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्रालय चे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, इराणविरोधातील अमेरिका-इस्रायल हल्ला हा केवळ जमीन, संसाधने किंवा भू-राजकारणासाठीचा संघर्ष नसून, वर्तमान आणि भविष्यात ‘चांगले’ आणि ‘वाईट’ यांचे अर्थ ठरवणारे युद्ध आहे.

बघाई यांनी अमेरिका आणि इस्रायलवर युद्धविरामाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. हा संघर्ष इराणवर लादण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, “आमच्या शांतताप्रिय देशावर लादले गेलेले हे केवळ आणखी एक युद्ध नाही. एका बाजूला असे लोक आहेत, ज्यांना युद्धाचे सर्व नियम आणि मानवी मूल्यांचे उल्लंघन करण्यात आनंद मिळतो. ते करमणुकीसाठी हत्या करतात. कुटुंबांना त्रास देण्यासाठी मुलांची हत्या करतात. महिलांच्या क्रीडा संकुलांवर केवळ स्वतःची ताकद तपासण्यासाठी नवी क्षेपणास्त्रे डागतात. निःशस्त्र जहाजे बुडवल्याचा त्यांना अभिमान वाटतो. दुसऱ्या बाजूला असे लोक आहेत, जे निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.”

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन दौर्यासाठी रवाना होण्यापूर्वी पुन्हा दावा केला की, इराणी सैन्य पूर्णपणे कमकुवत झाले आहे. अमेरिका हे युद्ध “शांततामय मार्गाने किंवा कोणत्याही प्रकारे” जिंकेल, असेही त्यांनी म्हटले. ट्रम्प म्हणाले, “आम्ही हे कोणत्याही मार्गाने जिंकू. शांततेतून किंवा इतर कोणत्याही पद्धतीने आम्ही विजय मिळवू. त्यांचे नौदल संपले आहे. त्यांचे हवाई दल संपले आहे. त्यांच्या युद्धशक्तीचा प्रत्येक भाग उद्ध्वस्त झाला आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande