तमिळनाडूत परदेशी नागरिकांनी केले मतदान, 17 जण ताब्यात
चेन्नई, 15 मे (हिं.स.) : तमिळनाडूमध्ये निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन केल्यानंतरही 17 परदेशी नागरिकांनी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पासपोर्ट तपासणीदरम्यान त्यांच्या बोटांवर आढळलेल्या शाईच्या खुणांमुळे हा प्रकार
ईव्हीएम संग्रहित फोटो


चेन्नई, 15 मे (हिं.स.) : तमिळनाडूमध्ये निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन केल्यानंतरही 17 परदेशी नागरिकांनी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पासपोर्ट तपासणीदरम्यान त्यांच्या बोटांवर आढळलेल्या शाईच्या खुणांमुळे हा प्रकार उघडकीस आला.

यासंदर्भातील माहितीनुसार, चेन्नई विमानतळावर गेल्या काही दिवसांत 15 जणांना त्यांच्या देशात परत जात असताना ताब्यात घेण्यात आले. तर मदुरै विमानतळावर आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. सध्या सर्व संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रवाशांपैकी काही जण मूळचे तमिळनाडू आणि पुडुचेरी येथील असून त्यांनी नंतर परदेशी नागरिकत्व स्वीकारले होते. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये 7 श्रीलंकन नागरिकांचाही समावेश आहे.चेन्नई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त ए. राधिका यांनी सांगितले की, परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे संबंधितांविरुद्ध जनप्रतिनिधित्व कायदा आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या घटनेमुळे मतदार यादीच्या अचूकतेबाबत आणि निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande