नीटची पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार
नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.)। राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) ने केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नीट (यूजी) २०२६ ची पुनर्परीक्षा २१ जून रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. संस्थेने सोशल मीडियावर परीक्षार्थी आणि पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी केव
NEET EXAM NEW DATE ANNOUNCE


नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.)। राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) ने केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नीट (यूजी) २०२६ ची पुनर्परीक्षा २१ जून रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

संस्थेने सोशल मीडियावर परीक्षार्थी आणि पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी केवळ एनटीएच्या अधिकृत माध्यमांवर जारी करण्यात आलेल्या माहितींवरच विश्वास ठेवावा. संस्थेने कोणतीही माहिती किंवा मदतीसाठी neet-ug@nta.ac.in हा ई-मेल तसेच ०११-४०७५९००० आणि ०११-६९२२७७०० हे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. दरम्यान, काल उशिरा रात्री शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी नीट परीक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत आगामी परीक्षेची तयारी, सुरक्षा व्यवस्था आणि परीक्षा संचालनाशी संबंधित विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, एनटीएचे महासंचालक, सीबीएसईचे अध्यक्ष, केंद्रीय विद्यालय संघटना आणि नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत आगामी परीक्षेच्या तारखेला अंतिम मंजुरी देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande