
नाशिक, 15 मे (हिं.स.)।
, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण 3 हजार 762 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे 64 कोटी 9 लाख 41 हजार 847 रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सतीश हिवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
लोकअदालमध्ये तडजोड करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालय व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात एकूण 49 पॅनेलची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व पॅनेल प्रमुख, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. रोकडे यांच्या मार्गदर्शखाली कामकाज केले. दावा दाखपूर्व प्रकरणांमध्ये एकूण 39 हजार 598 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 2 हजार 214 प्रकरणे निकाली निघाली असून रक्कम रूपये 3 कोटी 15 लाख 64 हजार 478 इतकी वसुली झाली. अशा प्रकारे न्यायालयातील प्रलंबित व दावादाखल पूर्व प्रकरणे मिळून एकूण 3 हजार 762 प्रकरणांचा निपटारा होवून एकूण रूपये 64 कोटी 9 लाख 41 हजार 847 इतके शुल्क झाली. या रकमे तडजोड रक्कम समाविष्ट आहे.
▪️मोटार वाहन चालकांना दिलासानाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण 2 हजार 487 मोटार वाहन प्रकरणामध्ये 354 प्रकरणे निकाली निघाली असून सदर वाहनचालकांना न्यायालीयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.
चौकट
▪️निकाली निघालेली प्रकरणे दृष्टीक्षेपात
▪️परक्राम्य संलेख अधिनियम,कलम 138 अंतर्गतची प्रकरणे – 473 प्रकरणे▪️मोटार अपघात प्रकरणे- 156 प्रकरणे▪️कामगार विषयक- 1 प्रकरण▪️कौटुंबिक वादातील प्रकरणे- 32 प्रकरणे▪️फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे- 200 प्रकरणे▪️इतर – 2900 प्रकरणे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV