एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये दुसऱ्या सर्जिकल रोबोटचे लोकार्पण
कॅन्सरमुक्त विद्यार्थिनीच्या हस्ते झाले अनावरण नाशिक, 15 मे (हिं.स.) : जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी ‘दुसऱ्या सर्जिकल रोबोट’चे लोकार्पण करण्या
Tele Robotics' inaugurated


कॅन्सरमुक्त विद्यार्थिनीच्या हस्ते झाले अनावरण

नाशिक, 15 मे (हिं.स.) : जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी ‘दुसऱ्या सर्जिकल रोबोट’चे लोकार्पण करण्यात आले.या विशेष सोहळ्याचे आकर्षण ठरले ते म्हणजे कर्करोगावर यशस्वीरित्या मात करून नुकतीच दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळवणाऱ्या शर्वरी खैरनार हिच्या हस्ते या टेलिरोबोटचे अनावरण झाले.

हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ. राज नगरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात कै. डॉ. वसंतराव नगरकर लिखित ‘बँकिंग आज आणि उद्या’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच त्यांच्या शिल्पाचे अनावरणही करण्यात आले. मुंबई नाका येथील मानवता हेल्थ कॅम्पस परिसरात हा सोहळा पार पडला.

डॉ. राज नगरकर यांनी सांगितले की, रुग्णांना अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हे हॉस्पिटलचे ध्येय आहे. यापूर्वी रोबोटिक असिस्टेड सर्जरीमध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली असून आता टेलिरोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूरस्थ शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. यामुळे जगातील इतर ठिकाणी दाखल रुग्णांवरही नाशिकमधून शस्त्रक्रिया करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शर्वरी खैरनार हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. फुफ्फुस आणि पायाची शस्त्रक्रिया तसेच केमोथेरपीच्या सहाय्याने तिने यशस्वी उपचार घेतले. कठीण परिस्थितीतही जिद्द न हरता तिने दहावी परीक्षेत 80 टक्के गुण मिळवले.

या सोहळ्यात शर्वरीच्या हस्ते रोबोटचे अनावरण करून तिच्या संघर्ष आणि यशाचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande