चंद्रपूर नागभीड तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
चंद्रपूर, 19 मे (हिं.स.)। नागभीड तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करीत जागीच ठार केले आहे. सदर घटना मंगळवारी घडली. नेहमीप्रमाणे नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढ
वाघाचे प्रतिकात्मक छायाचित्र


चंद्रपूर, 19 मे (हिं.स.)। नागभीड तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करीत जागीच ठार केले आहे. सदर घटना मंगळवारी घडली.

नेहमीप्रमाणे नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा येथील रहिवासी असलेली वंदना शंकर ऊईके ही महिला बाळापूर येथील वनविकास महामंडळाच्या जंगलात गेली होती. त्यावेळी तेथे असणाऱ्या वाघाने अचानक हल्ला चढवत तिच्या नरडीचा घोट घेतला. हा हल्ला इतका भयानक होता की इंदिराबाईंचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी वनविकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आलेली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande