नाशिक - वृद्धेला डांबून ठेवत मोलकरणीने मारला चार लाख रुपयांवर डल्ला
नाशिक, 19 मे (हिं.स.)। वृद्धेला बाथरूममध्ये बंद करून घरातील मोलकरणीने ४ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी बीबीबतुल ऐनुल्ला अन्सारी (वय ८७, रा. मॉडर्न बंगलो, अशोका पॉ
नाशिक - वृद्धेला डांबून ठेवत मोलकरणीने मारला चार लाख रुपयांवर डल्ला


नाशिक, 19 मे (हिं.स.)। वृद्धेला बाथरूममध्ये बंद करून घरातील मोलकरणीने ४ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी बीबीबतुल ऐनुल्ला अन्सारी (वय ८७, रा. मॉडर्न बंगलो, अशोका पॉईंट, वडाळा रोड) या सेवानिवृत्त वृद्धा आहेत. त्यांच्याकडे संशयित मोहसीना शरजिल मोमिन (मूळ रा. भिवंडी, जि. ठाणे, ह. मु. भारतनगर, नाशिक) ही घरमाकासाठी मोलकरीण म्हणून काम करते. दि. १५ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान फिर्यादी अन्सारी यांची मोलकरीण मोहसीना हिने अन्सारी यांना बाथरूममध्ये बंद करून कोंडून ठेवले. त्यानंतर फिर्यादी हिने घरातील कपाटात ठेवलेली चार लाख रुपयांची रोकड मोलकरीण मोहसीना हिने चोरून नेली. संशयावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात मोलकरीण मोहसीनाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande