लातूर - केशवराज मंदिरात पंच कुंडात्मक याग व पवमान स्वाहाकार महायज्ञ
लातूर, 19 मे, (हिं.स.)। लातूर येथील श्री केशवराज मंदिरात दि. २१ ते २३ मे या कालावधीत पंच कुंडात्मक महाविष्णू याग व पवमान स्वाहाकार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक विधी श्रीक्षेत्र मोहटादेवीचे प्रधान आचार्य बबनदेव कुलकर्णी यांच्या मार्ग
केशवराज मंदिर


लातूर, 19 मे, (हिं.स.)। लातूर येथील श्री केशवराज मंदिरात दि. २१ ते २३ मे या कालावधीत पंच कुंडात्मक महाविष्णू याग व पवमान स्वाहाकार महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक विधी श्रीक्षेत्र मोहटादेवीचे प्रधान आचार्य बबनदेव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

प्रत्येक तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाच्या निमित्ताने यावर्षीच्या अधिकमासामध्ये पूर्णवादाचार्य सदगुरु रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या

शुभाशिर्वादाने व पूर्णवाद वर्धिष्णू विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेने सदर धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञकाळात सामूहिक श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, सामूहिक श्री सूक्त पठण व कुंकुमार्चन तसेच स्वर्णीनंद ग्रुपकडून गायनसेवा सादर होणार आहे. दररोज रात्री ८ ते ९ अया वेळेत भजनसेवा होणार आहे. या पवित्र काळात श्री केशवराजच्या मूर्तीस तीन दिवस विष्णू सहस्रनामासह १ लाख तुलशी अर्पण केल्या जातात. या सोहळ्याचे मुख्य महाप्रसाद यजमान दीपक हरी कोटलवार हे आहेत. मुख्य तुलशी अर्चना यजमान पापशेठ ताथोडे परिवार, मुख्य यज्ञ यजमान धर्मवीर भारती, आयोजक केशवराज मंदिर हे आहेत.

या धार्मिक सोहळ्याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन केशवराज मंदिरचे विश्वस्त अध्यक्ष अॅड. संजय पांडे, उपाध्यक्ष बजरंगलाल रांदड, सचिव मधुकर पाठक, अशोक गोविंदपूरकर, पापासेठ ताथोडे, अॅड. कालिदास देशपांडे, मनोहर सावळे, मधुसूदन भुतडा, दामोदर भुतडा, राजाभाऊ पांडे, शाम कोटलवार, योगेश उन्हाळे, सुनील अयाचित, सुमुख गोविंदपूरकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande