
लातूर, 19 मे, (हिं.स.)। लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. मन्मथ भातांब्रे यांनी त्यांच्या मातोश्री शिवैक्य गुंडाबाई शंकरप्पा भातांब्रे यांच्या जीवनावर आधारित या पुस्तकात लेखकाने 'माझी बहुआयामी आई' या ग्रंथात आपल्या आईच्या खडतर जीवनसंघर्षाचे, त्यागाचे आणि संस्कारांचे अतिशय भावस्पर्शी चित्रण केले. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा वाराणसी जगतगुरू श्री श्री श्री १००८ डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते दि २० मे रोजी शिरूर अनंतपाळ शहरातील मोरया लॉन्स येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
या प्रसंगी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर सदगुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज, मरुघेद्र स्वामी महाराज, कासारशिरसी, प्राचार्य सोमनाथ रोडे, लॉयन्स क्लबच्या उप प्रांतपाल सौ. सुप्रिया कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे व परिवाराच्या वतीने करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis