बीड - आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत शिवाय शितोळेला रौप्य पदक
बीड, 19 मे, (हिं.स.)नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या ११ व्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कोल्हापूरच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दुसरीतील बालखेळाडू शिवाय महेश्वर शितोळे याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. शिवायच्या या
बीड - आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत शिवाय शितोळेला रौप्य पदक


बीड, 19 मे, (हिं.स.)नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या ११ व्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कोल्हापूरच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दुसरीतील बालखेळाडू शिवाय महेश्वर शितोळे याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. शिवायच्या या दैदिप्यमान यशामुळे अंबाजोगाई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विविध देशांतील ६०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग असलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत शिवायने हे यश मिळवले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याची श्रीलंकेत होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी थेट निवड झाली आहे. शिवायला त्याचे प्रशिक्षक रमेश पिसाळ, सुषमा पिसाळ, आई डॉ. अक्षरा शितोळे, वडील डॉ. महेश्वर शितोळे, आजी डॉ. आशा शितोळे आणि आजोबा डॉ. दत्तात्रय शितोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवायने कठोर मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे घवघवीत यश मिळवले असल्याचे सांगत त्याचे प्रशिक्षक रमेश पिसाळ यांनी त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande