
-ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे नेतृत्वाची धुरा-रोनाल्डो कारकिर्दीतील विक्रमी सहाव्या फिफा विश्वचषकात खेळणार
लिस्बन, २० मे (हिं.स.). पोर्तुगालने आगामी फिफा विश्वचषक २०२६ साठी आपल्या संघाची घोषणा केली. अनुभवी स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्यासोबत ब्रुनो फर्नांडिस, बर्नार्डो सिल्वा आणि विटिन्हा यांच्यासह इतर अनेक स्टार फुटबॉलपटूंचा समावेश आहे.
४१ वर्षीय रोनाल्डो आपल्या कारकिर्दीतील विक्रमी सहाव्या फिफा विश्वचषकात खेळणार आहे. या कामगिरीमुळे तो अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आणि मेक्सिकोचा गोलरक्षक गुइलेर्मो ओचोआ यांच्या पंक्तीत सामील होणार आहे.
युरो २०१६ चा विजेता पोर्तुगाल विश्वचषकासाठी 'क' गटात (Group K) आहे, जिथे त्यांचा सामना डीआर काँगो, कोलंबिया आणि उझबेकिस्तान यांच्याशी होईल.
आपल्या विश्वचषक मोहिमेच्या सुरुवातीपूर्वी, पोर्तुगाल चिली आणि नायजेरियाविरुद्ध सराव सामने खेळेल. त्यानंतर संघ १७ जून रोजी डीआर काँगोविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर २३ जून रोजी उझबेकिस्तान आणि २७ जून रोजी कोलंबियाविरुद्ध सामने होतील.
FIFA विश्वचषक 2026 साठी पोर्तुगालचा संघ
गोलरक्षक: डिओगो कोस्टा, जोसे सा, रुई सिल्वा, रिकार्डो वेल्हो
डिफेंडर: डिओगो डालोट, मॅथ्यूस न्युनेस, नेल्सन सेमेडो, जोआओ कॅन्सेलो, नुनो मेंडेस, गोंसालो इनासियो, रेनाटो वेगा, रुबेन डायस, टॉमस अराउजो
मिडफिल्डर: रुबेन नेव्हस, जोआओ नेवेस, विटिन्हा, ब्रुनो फर्नांडिस, बर्नार्डो सिल्वा, जोआओ फेलिक्स, फ्रान्सिस्को ट्रिन्काओ, फ्रान्सिस्को कॉन्सेइको, सॅमू कोस्टा
फॉरवर्ड: पेड्रो नेटो, राफेल लियाओ, गोंकालो गुएडेस, गोंकालो रामोस, ख्रिस्तियानो रोनाल्डो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे