
कोल्हापूर, 20 मे (हिं.स.)। पुलाची शिरोली येथे सर्वेश्वर क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रो लीग कबड्डी महासंग्राम २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थ्री वॉरियर्स संघाने दमदार खेळ करत शिवमुद्रा रोहिदास संघावर २९-२३ अशी ६ गुणांनी मात करून प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.
शिवमुद्रा रोहिदास संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर तिसरा क्रमांक शिव-साई इलेक्ट्रिकल्स नागाव संघाने पटकावला
अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सामना चुरशीचा केला.
थ्री वॉरियर्सच्या खेळाडूंनी सलग तीन सामन्यात एकसंघपणा, अचूक चढाया व भक्कम पकडी करत. अंतिम सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेत शिवमुद्रा रोहिदास संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर तिसरा क्रमांक शिव-साई इलेक्ट्रिकल्स नागाव संघाने पटकावला. आर आर किंग संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील सर्व संघांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. शिवमुद्रा रोहिदास संघाने शेवटपर्यंत जोरदार झुंज दिली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र उत्तरार्धात थ्री वॉरियर्सच्या खेळाडूंनी वेगवान चढाया करत गुणांची आघाडी घेतली. स्पर्धेनंतर विविध वैयक्तिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिवमुद्रा रोहिदास संघाचा निखिल बनगे याला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू पुरस्कार देण्यात आला. त्याने संपूर्ण स्पर्धेत चढाई आणि पकड या दोन्ही विभागांत उल्लेखनीय कामगिरी केली. थ्री वॉरियर्सचा निरंजन पाटील याने सर्वोत्कृष्ट चढाईचा पुरस्कार पटकावला. त्याच्या वेगवान आणि अचूक चढायांनी अंतिम सामन्यात संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर सौरभ धनगर याला सर्वोत्कृष्ट पकड पुरस्काराने गौरविण्यात आले. तिसऱ्या दिवसाचा मॅन ऑफ द डे पुरस्कार अनंत सोडगे याला प्रदान करण्यात आला.
या अंतिम सामन्यास आणि बक्षीस वितरण समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच सुरेश यादव, उद्योजक संतोष बाटे, धिरज पाटील, नितीन चव्हाण, भाजप जिल्हा ओबीसी अध्यक्ष दिपक रानमाळे भाजप तालुका ओबीसी अध्यक्ष अर्जुन चौगुले, उपसरपंच विजय जाधव, संदीप तानवडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार, उद्योजक उदय खटाळे, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड, संजय पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, कुमार पाटील, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar