आर्सेनलने २२ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवत प्रीमियर लीग चॅम्पियनशिप जिंकली
लंडन, 20 मे (हिं.स.) आर्सेनल एफसीने प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे. संघाने २२ वर्षांनंतर हे विजेतेपद जिंकले असून, ही कामगिरी अत्यंत विशेष ठरली आहे. संघाने शेवटचे २००४ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. इंग्लंडमधील बोर्नमाउथ येथील व्हायटॅलिटी स्टेडिय
आर्सेनलचा संघ


लंडन, 20 मे (हिं.स.) आर्सेनल एफसीने प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे. संघाने २२ वर्षांनंतर हे विजेतेपद जिंकले असून, ही कामगिरी अत्यंत विशेष ठरली आहे. संघाने शेवटचे २००४ मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती. इंग्लंडमधील बोर्नमाउथ येथील व्हायटॅलिटी स्टेडियमवर गतविजेत्या मँचेस्टर सिटी एफसीला एएफसी बोर्नमाउथने १-१ अशा बरोबरीत रोखले. विजेतेपदाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पेप गार्डिओलाच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते, पम बोर्नमाउथच्या प्रभावी कामगिरीने त्यांच्या आशांवर पाणी फेरले.

सामन्यातील निर्णायक क्षण ३९ व्या मिनिटाला आला, जेव्हा १९ वर्षीय फ्रेंच खेळाडू एली ज्युनियर क्रूपीने एका शानदार गोलने बोर्नमाउथला आघाडी मिळवून दिली. एड्रियन ट्रूफर्टच्या पासवर क्रूपीने अप्रतिम फर्स्ट टच घेतला आणि त्यानंतर एक वळणदार शॉट नेटमध्ये मारला. गोलकीपर जियानलुइगी डोनारुम्मा तो शॉट अडवू शकला नाही.

अर्लिंग हालंडच्या बरोबरीच्या गोलने सिटीच्या पुनरागमनाला चालना दिली आणि विजयाच्या आशा वाढवल्या, परंतु मँचेस्टरचा आनंद अल्पकाळ टिकला. काही सेकंदांनंतर, सामना संपल्याचे जाहीर करण्यात आले आणि मँचेस्टर सिटीचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. आर्सेनलला विजेते घोषित करण्यात आले.

मिकेल आर्टेटाच्या नेतृत्वाखाली आर्सेनलने एक उत्कृष्ट खेळ केला. आदल्या दिवशी आधीच रेलीगेट झालेल्या बर्नली एफसीला १-० ने हरवून संघाने स्वतःला एका मजबूत स्थितीत आणले होते. आर्सेनलने एका हंगामात कॉर्नर किक्समधून सर्वाधिक गोल करण्याचा प्रीमियर लीग विक्रमही प्रस्थापित केला.

मँचेस्टर सिटी आणि बोर्नमाउथ यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्याची बातमी पसरताच, हजारो आर्सेनल समर्थकांनी एमिरेट्स स्टेडियमबाहेर जल्लोष करण्यास सुरुवात केली. आता, आर्टेटाच्या संघाला इतिहास रचण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. ३० मे रोजी बुडापेस्ट येथे होणाऱ्या युएफा चॅम्पियन्स लीग फायनल २०२५ मध्ये आर्सेनलचा सामना पॅरिस सेंट-जर्मेन एफसीशी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande