काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी २६ ते ३० मे दरम्यान प्रशिक्षण कार्यशाळा
मुंबई, 21 मे, (हिं.स.)। राज्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत राज्यात सात हजार नविन पदाधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. या नवनियुक्त पदाधिका-यांसाठी महाराष्ट्
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी २६ ते ३० मे दरम्यान प्रशिक्षण कार्यशाळा


मुंबई, 21 मे, (हिं.स.)। राज्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत राज्यात सात हजार नविन पदाधिकारी नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. या नवनियुक्त पदाधिका-यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस मुख्यालय टिळक भवन, दादर येथे २६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत विविध विभागांच्या ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक कार्याध्यक्षांसाठी विभागनिहाय एकदिवसीय कार्यशाळा पार पडणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळांमध्ये संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क, सोशल मीडिया संवाद, बूथस्तरीय नियोजन आणि विविध समाजघटकांशी समन्वय यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यामध्ये सहभागी होऊन पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

कार्यशाळांचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे :

* २६ मे – सोशल मीडिया विभाग

* २७ मे – ओबीसी विभाग

* २९ मे – अनुसूचित जाती विभाग

* ३० मे – अल्पसंख्याक विभाग

प्रत्येक दिवशी सकाळी १० वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून दिवसभर विविध सत्रांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. कार्यशाळेचा समारोप सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले असून नव्या पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामासाठी सक्षम करण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande