देवणी तालुक्यात सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार
लातूर, 22 मे (हिं.स.) : देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी येथे भाजपा कार्यकर्ते राजजी गुणाले यांच्या मातोश्री सौ. पंचफुला किशनराव गुणाले यांच्या अंगणवाडी शिक्षिका पदावरील प्रदीर्घ व समर्पित सेवेनिमित्त सेवापूर्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
गौरव सोहळा

या कार्यक्रमास लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभही हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता.

या विशेष सोहळ्यास माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी उपस्थित राहून सौ. पंचफुला गुणाले यांच्या नि:स्वार्थ सेवाभावाचे कौतुक केले. त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात लातूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. उषाताई पाटील तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, पंचायत समिती सभापती अंकिताताई पाटील, निलंगा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजयराज हालगरकर, सुमित ईनानी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांना त्यांच्या आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.संपूर्ण कार्यक्रमात स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती असून वातावरण उत्साहपूर्ण व आनंददायी होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

 rajesh pande