शिवलिंग बोधने यांच्यासह प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
परभणी, 22 मे (हिं.स.)। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी शुक्रवार 22 मे रोजी मुंबई येथील मातोश्री या ठिकाणी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेने
शिवलिंग बोधने यांच्यासह प्रहारच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश


परभणी, 22 मे (हिं.स.)।

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी शुक्रवार 22 मे रोजी मुंबई येथील मातोश्री या ठिकाणी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उद्धव गरुड, संजय वाघमारे, नितीनकुमार वैराळ यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच धाराशिव जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वशिष्ठ तात्या शिंदे यांनीही आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे, आमदार राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर तसेच जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर शिवलिंग बोधने यांनी परभणी जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक घेऊन परभणी जिल्हा बच्चू कडू यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटात जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती.

प्रवेश सोहळ्यात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवलिंग बोधने म्हणाले, वीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेच्या आपल्या हक्काच्या घरी परतताना आनंद होत आहे. सत्तेसाठी तडजोड न करता महाराष्ट्रातील शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देणार्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खर्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande