मल्याळम अभिनेता ममूटी यांना तिसऱ्यांदा मानद डॉक्टरेट प्रदान
तिरुवनंतपुरम, 25 मे (हिं.स.)।मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते ममूटी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. केरळमधील महात्मा गांधी विद्यापीठतर्फे त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ दिलेल्या उल्लेखन
मल्याळम अभिनेता ममूटी यांना तिसरी मानद डॉक्टरेट प्रदान


तिरुवनंतपुरम, 25 मे (हिं.स.)।मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते ममूटी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. केरळमधील महात्मा गांधी विद्यापीठतर्फे त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी अभिनेत्याला ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही मानद पदवी देण्यात आली.

केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ममूटी यांना हा सन्मान प्रदान केला. ममूटी यांच्यासाठी ही तिसरी मानद डॉक्टरेट ठरली आहे.विद्यापीठाने मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी आणि इंग्रजीसह विविध भाषांतील भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला आहे. ममूटी यांनी आपल्या कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला असून आजही ते चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि मान्यवर कलाकारांपैकी एक मानले जातात.

हा सन्मान स्वीकारल्यानंतर ममूटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले. त्यांनी एक्सवर काही छायाचित्रे शेअर करत लिहिले, “आज महात्मा गांधी विद्यापीठाकडून केरळच्या राज्यपालांच्या हस्ते ‘मानद डी.लिट.’ स्वीकारताना मला अभिमान वाटत आहे. या अविस्मरणीय प्रवासात प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.” यापूर्वी २०१० मध्ये कालीकट विद्यापीठ आणि केरळ विद्यापीठ यांच्याकडूनही त्यांना अशाच प्रकारच्या मानद पदव्यांनी गौरविण्यात आले होते. त्या वेळी ममूटी यांना “सिताऱ्यांचा सितारा” असे संबोधण्यात आले होते.

ममूटी नुकतेच पॅट्रियट या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात मोहनलाल, फहाद फासिल आणि नयनतारा यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.प्रसिद्ध दिग्दर्शक अडूर गोपालकृष्णन आणि ममूटी आगामी मल्याळम चित्रपट पदयात्रा साठी पुन्हा एकत्र काम करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande