
कोलकाता, 25 मे (हिं.स.)।अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोलिसांच्या पथकाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्या घरातून पोलिसांनी मॉनिटर सहित अनेक वस्तू जप्त केल्या असून त्या सोबत घेऊन गेले आहेत.
अभिषेक बॅनर्जी यांचे घर १८८-ए, हरीश मुखर्जी रोड येथे आहे. सोमवारी, २५ मे रोजी कोलकाता पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि मॉनिटरसह अनेक साहित्य जप्त करून घेऊन गेले.
या प्रकरणात कोलकाता महानगरपालिकेकडून अवैध बांधकामासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नोटीस दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र या संदर्भात पोलिसांकडून अद्याप अधिकृत आणि सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode