“एक्साइज ड्युटी कमी केल्यास एक लाख कोटींचा महसुली तोटा”
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर अर्थमंत्री सीतारामन यांचा खुलासा नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (एक्साइज ड्युटी) कमी केल्यास सरकारला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा महसूल तोटा होऊ शकतो असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारा
निरमाला सीतारामन


पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर अर्थमंत्री सीतारामन यांचा खुलासा

नवी दिल्ली, 25 मे (हिं.स.) : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क (एक्साइज ड्युटी) कमी केल्यास सरकारला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा महसूल तोटा होऊ शकतो असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या (एसआयडीबीआय) 37 व्या वर्धापन दिन समारंभात आज, सोमवारी त्या बोलत होत्या.

इंधनाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मागील 10 दिवसांत ही चौथी वाढ असून, सोमवारी पेट्रोलच्या दरात 2.61 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात 2.71 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. यामुळे कुटुंबांच्या बजेटवर आणि वाहतूक खर्चावर अधिक ताण आला आहे. यावेळी सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा उल्लेख करत नकारात्मक वातावरण आणि निराशावादी दृष्टिकोनावर टीका केली. त्यांनी सांगितले की देशाला शब्द आणि कृती या दोन्ही माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी मध्य पूर्व संकटाचा उल्लेख करत “तीन एफ” इंधन (फ्युएल), खत (फर्टिलायझर) आणि परकीय चलन (फोरेक्स) यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. जागतिक अनिश्चिततेनंतरही भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्तमानात देशातील काही लोक परिस्थिती अतिशय नकारात्मक स्वरूपात मांडत आहेत, मात्र वास्तव असे नाही. भारताची देशांतर्गत आर्थिक स्थिती अजूनही मजबूत आणि सकारात्मक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande