परभणीत वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक यश; ‘किसिंग स्टेंटिंग’ शस्त्रक्रियेतून ६८ वर्षीय रुग्णाचे दोन्ही पाय वाचले
परभणी, 26 मे (हिं.स.) : परभणीतील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने मराठवाड्याच्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अत्यंत गुंतागुंतीची ‘किसिंग स्टेंटिंग’ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. रुग्णालयाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. रा
आर.पी. हॉस्पिटलमध्ये मराठवाड्यातील पहिली ‘किसिंग स्टेंटिंग’ शस्त्रक्रिया यशस्वी दोन्ही पाय कापण्यापासून वृद्ध रुग्णाला दिले नवजीवन


परभणी, 26 मे (हिं.स.) : परभणीतील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने मराठवाड्याच्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अत्यंत गुंतागुंतीची ‘किसिंग स्टेंटिंग’ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

रुग्णालयाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर खान यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ अंतर्गत सुमारे ४ ते ५ लाख रुपये खर्चाची असून ती एका ६८ वर्षीय रुग्णावर पूर्णपणे मोफत करण्यात आली.

रुग्णाला ‘एओर्टो-बाय इलिऍक ऑक्लूझिव्ह डिसीज’ (Leriche Syndrome) या दुर्मिळ व गंभीर आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे पोटातील मुख्य धमनीपासून दोन्ही पायांकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या पूर्णपणे बंद झाल्याने रुग्णाच्या दोन्ही पायांमध्ये गॅंगरीन निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी पाय कापण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मात्र आर.पी. हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘किसिंग स्टेंटिंग’ ही एंडोव्हॅस्क्युलर पद्धत वापरून दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट बसवले. या प्रक्रियेत दोन्ही स्टेंट पोटातील महाधमनीमध्ये एकमेकांना स्पर्श करतात, त्यामुळे याला ‘किसिंग स्टेंटिंग’ असे म्हटले जाते.

शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दहा मिनिटांत रुग्णाच्या पायातील रक्तप्रवाह पूर्ववत सुरू झाला. विशेष म्हणजे ४८ तासांत रुग्ण स्वतःच्या पायाने चालत घरी परतला.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास गॅंगरीन, अंगच्छेदन आणि गंभीर संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande