रत्नागिरी : तळवडे गावाचा मधाचे गाव म्हणून राज्यस्तरावर गौरव
रत्नागिरी, 26 मे (हिं.स.) । महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते तळवडे (ता. राजापूर) मधाचे गाव म्हणून राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. जागतिक मधमाशी दिनानिमित्त संभाजी नगर येथे राज्यस्तरीय मधुमित्र व मधुसखी पुर
रत्नागिरी : तळवडे गावाचा मधाचे गाव म्हणून राज्यस्तरावर गौरव


रत्नागिरी, 26 मे (हिं.स.) । महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते तळवडे (ता. राजापूर) मधाचे गाव म्हणून राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.

जागतिक मधमाशी दिनानिमित्त संभाजी नगर येथे राज्यस्तरीय मधुमित्र व मधुसखी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. या वेळी तळवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मंगेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, नित्यानंद पाटील आदी उपस्थित होते.

राजापूर तालुक्यातील तळवडे हे राज्यातील ११वे मधाचे गाव म्हणून घोषित झाले असून, यासाठी शासनाचा ५३.९८ लाख रुपये निधीदेखील मंजूर झाला आहे. यामुळे पर्यटनासाठी शेती, फलोत्पादन आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. पितांबरी उद्योग समूहाने मधाचे म्हणून विकासित करण्यासाठी प्रयत्न केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande