कोल्हापूर महापालिकेत घरफाळा वसुलीसाठी विशेष मोहीम
थकबाकी वसुली वाढविण्याचे आयुक्तांचे आदेश कोल्हापूर, 26 मे (हिं.स.) : कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागाने चालू आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तत्काळ वसुली वाढविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. घरफाळ
घरफाळा विभागाच्या वसुली कामकाजाचा आढावा


थकबाकी वसुली वाढविण्याचे आयुक्तांचे आदेश

कोल्हापूर, 26 मे (हिं.स.) : कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागाने चालू आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तत्काळ वसुली वाढविण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. घरफाळा विभागाच्या वसुली कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या प्रारंभी कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी स्लाईड शोद्वारे घरफाळा विभागाची सविस्तर माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, चालू मागणीवरील 6 टक्के सवलत योजनेतून आतापर्यंत 9 कोटी रुपयांची वसुली झाली असून 30 जुलै 2026 अखेर 30 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी घरफाळा विभागातील चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कमी वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्वतः आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कर्मचाऱ्याने वसुली वाढीसाठी प्रयत्न करावेत, नवीन मिळकतींचा शोध घेऊन उत्पन्न वाढवावे तसेच 6 टक्के सवलतीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

थकबाकीतील दुबार नोंदींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून थकीत 73 कोटी 77 लाख रुपयांपैकी यावर्षी किमान 20 ते 25 कोटी रुपयांची वसुली करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, शासकीय थकबाकी तसेच मोबाईल टॉवर थकबाकीबाबत तत्काळ पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले.

ज्या शासकीय इमारतींना अद्याप घरफाळा आकारलेला नाही, अशा सर्व मिळकतींना कर आकारणी करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मोठ्या शासकीय व व्यावसायिक थकबाकीदारांची ‘टॉप 10’ यादी तयार करून विशेष वसुली मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

नव्याने शोधलेल्या 6 हजार मिळकतींना अंतिम 7 दिवसांची नोटीस देऊन कर आकारणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. विभागीय कार्यालय स्तरावर नियमित वसुली बैठका घेण्यासह थकीत व्यावसायिक मिळकती सील करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

या बैठकीस सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, अज्वला शिंदे, जयंत जावडेकर, विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, अधिक्षक अशोक यादव, दत्तप्रसाद माजगांवकर, अर्चना प्रभावळे उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande