लातूर - जनगणनेचे काम डावलणाऱ्या प्रगणकांना तहसीलदारांची थेट नोटीस
लातूर, 26 मे, (हिं.स.)। जनगणना कामासाठी प्रगणक म्हणून तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले आदेश डावलून अद्याप कामकाज सुरू न करणाऱ्या तालुक्यातील विविध शाळांच्या चार शिक्षकांना जनगणना संपर्क अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. त्यांना नोटिसा बजावून २४
नोटीस


लातूर, 26 मे, (हिं.स.)। जनगणना कामासाठी प्रगणक म्हणून तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले आदेश डावलून अद्याप कामकाज सुरू न करणाऱ्या तालुक्यातील विविध शाळांच्या चार शिक्षकांना जनगणना संपर्क अधिकाऱ्यांनी दणका दिला आहे. त्यांना नोटिसा बजावून २४ तासांत खुलासा सादर करा अन्यथा जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ५ तसेच ११ च्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सध्या जनगणनेचे दुसऱ्या टप्प्यातील कामकाज सुरू आहे. घर गणनेचे काम करण्यात येत आहे. अनेक प्रगणकांनी जवळपास ५० टक्के कामे पूर्ण केली आहेत. परंतु, प्रशिक्षण घेऊन चौघांनी नियुक्ती आदेश डावलत अद्याप कामकाज सुरू केले नाही. त्यामुळे या चौघांना जनगणना संपर्क अधिकारी तथा तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. जनगणना आदेश का डावलले याबाबत २४ तासांच्या आत समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्यात यावा, अन्यथा जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ५ आणि ११ मधील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अधिनियमानुसार कारवाई काय...

जनगणना हे राष्ट्रीय कामकाज असल्यामुळे त्यात निष्काळजीपणा करून दोषी आढळल्यास जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ५ तसेच ११ मधील तरतुदीनुसार १ हजार रुपये आर्थिक दंड अथवा तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande