खून प्रकरणातील मध्य प्रदेशातील तिघांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक
रत्नागिरी, 03 मे (हिं.स.) । झाबुवा पोलीस ठाण्यात (जि. झाबुवा, मध्य प्रदेश) दाखल असलेल्या खून प्रकरणातील तीन संशयितांना रत्नागिरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी या तिघांनाही झाबुवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या
मध्य प्रदेशातील तिघा खुन्यांना रत्नागिरीत अटक


रत्नागिरी, 03 मे (हिं.स.) । झाबुवा पोलीस ठाण्यात (जि. झाबुवा, मध्य प्रदेश) दाखल असलेल्या खून प्रकरणातील तीन संशयितांना रत्नागिरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी या तिघांनाही झाबुवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी दाऊद सन ऑफ चिलिया वाकला, नब्बु सन ऑफ चिलिया वाकला आणि चिलिया सन ऑफ कलिसिंग वाकला (सर्व रा. झाबुवा, मध्य प्रदेश) यांच्या विरोधात कोतवाली झाबुवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हे संशयित रत्नागिरी जिल्ह्यात आढळले. मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा घडल्यापासून संबंधित आरोपी फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक आज रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील अंमलदार यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तिघांना अटक करून पुढील तपासासाठी संबंधित आरोपींना झाबुवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande