
अकोला, 04 मे (हिं.स.)। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत इतिहास रचला. तर आसाम व पाँडिचेरीमध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा सत्ता मिळवत भाजप-एनडीएने हॅट्रिक साधली. महाराष्ट्रातील निवडणुकीतही भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या विजयाचा जल्लोष अकोल्यात जयप्रकाश नारायण चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह व भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर आतिषबाजी, ढोल-नगारे वाजवून, पेढे वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, माधव मानकर, अंबादास उमाळे, डॉ. शंकरराव वाकोडे, ॲड. देवाशिष काकड, पवन महल्ले, सिद्धार्थ शर्मा, वसंत बाछुका, वैशाली शेळके, पुरुषोत्तम पानझाडे, दिलीप मिश्रा, चंदा शर्मा, चंदा ठाकूर, किशोर वारोकार, संदीप गावंडे, नितेश पाली, तुषार भिरड, निलेश निनोरे, हेमंत शर्मा, रुपेश ठाकूर, रुपेश यादव, अमोल गीते, रमेश करिहार, मंजुषाताई शेळके, शितल जाईल, प्रशांत जोशी, कन्या आऊजा, संदीप शेगोकार, राजू थोरवे, विनोद मापारी, राम खरात, पल्लवी मोरे, नारायण बोर्डे, उमेश श्रीवास, रोहित चौरसिया, डॉ. अमित कावरे, किशोर कुचके, गणेश लोड, रणजीत खेडकर, मनीष बाछुका, कृष्णा पांडे, संजय झाडोकार, राजेंद्र गिरी, गोपाल मुळे, संजय कोरडे, ॲड. नितीन गवळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार रणधीर सावरकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास घडवला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणाला जनतेने नाकारले. आसाम व पाँडिचेरीत हॅट्रिक करून जनतेने विकास, हिंदुत्व व राष्ट्रवादावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजयाने 2027 व 2029 च्या विजयाची नांदी झाली आहे. हा विजय बूथ कार्यकर्त्यांच्या त्यागाचा, संघ परिवाराच्या तपस्येचा व कालीमाता, कामाख्या देवीच्या आशीर्वादाचा आहे. अकोल्यातील प्रत्येक घरात आता कमळ पोहोचेल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे