जनगणना 2027 संदर्भात व्हायरल अर्ज बनावट; नागरिकांना प्रशासनाचे सावधानतेचे आवाहन
लातूर, 04 मे (हिं.स.) : जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अर्जांपासून दूर राहावे, असे प्रशासनाने आवाह
फेक अर्ज


लातूर, 04 मे (हिं.स.) : जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अर्जांपासून दूर राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच आपली माहिती सादर करावी. यासाठी दोन अधिकृत पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे स्व-नोंदणी, ज्यामध्ये नागरिक अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in

वर जाऊन ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळणारा ‘SE ID’ नंतर प्रगणकांच्या भेटीदरम्यान पडताळला जाणार आहे.

दुसरा पर्याय म्हणजे थेट माहिती देणे. दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत अधिकृत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या वेळी नागरिकांनी प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी पूर्ण करावी.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत लिंक, अर्ज किंवा अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देणे टाळावे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहून केवळ अधिकृत मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande