निवडणूक निकालानंतर उदगीर शहरात भाजपाचा जल्लोष
लातूर, 04 मे (हिं.स.)।पश्चिम बंगाल , पॅडीचेरी , आसाम व झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपाला प्रचंड यश मिळाल असून 15 वर्षा पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनरजी यांच्या राज्य कारभारावर जनता नाराज झाली होती भाजपाने ही सत्ता संपुटात आणली . त्याचबरोबर इतर राज्यात
भाजप जल्लोष


लातूर, 04 मे (हिं.स.)।पश्चिम बंगाल , पॅडीचेरी , आसाम व झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपाला प्रचंड यश मिळाल असून 15 वर्षा पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनरजी यांच्या राज्य कारभारावर जनता नाराज झाली होती भाजपाने ही सत्ता संपुटात आणली . त्याचबरोबर इतर राज्यात सुद्धा भाजपाने गगन भरारी गाठली आहे. याच पार्श्वभूमीवर आज उदगीर शहरांमध्ये स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला

यावेळी भाजपा कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आतिषबाजी करण्यात आली व पेढे वाटून हा जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजपाचे माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, माजी नगराध्यक्ष बसवराज अण्णा बागबंदे, नगरसेवक मनोजदादा पुदाले, सुधीरभाऊ भोसले , सचिनभाऊ हुडे ,राजकुमार हुडगे, गणेश गायकवाड, आनंद बुंदे, चंद्रकांत कोठारे,भाजपाचे शहराध्यक्ष अमोल अनकल्ले,भाजपाचे शहर उपाध्यक्ष डॉ रवी मुळे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तराताई कलबुर्गे , यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande