एकाच गावातून चार तरुण 'पीएसआय'
लातूर, 04 मे (हिं.स.)। : कठोर परिश्रम, जिद्द आणि नोकरीसोबत केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उदगीर तालुक्यातील देवूळवाडी येथील चार तरुणांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) मर्यादित विभागीय प
पीएसआय


लातूर, 04 मे (हिं.स.)। : कठोर परिश्रम, जिद्द आणि नोकरीसोबत केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उदगीर तालुक्यातील देवूळवाडी येथील चार तरुणांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) मर्यादित विभागीय परीक्षेच्या अंतीम निकाल जाहीर झाला या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर देवुळवाडी येथिल ४ तरुणांनी पोलीस उपनिरिक्षक पदावर झेप घेत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. उदगीर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या या देवूळवाडी गावातील पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या ४ तरुणांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे.एकाचवेळी एकाच गावातून ४ जणांची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याची ही घटना परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रातही पहिल्यांदाच घडल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत झालेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून या निकालात उदगीर तालुक्यातील देवूळवाडी येथील विविध ठिकाणी पोलीस दलात कार्यरत असलेल्या चार पोलीस हवालदारांनीयश मिळवले आहे. त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.

या गावातील प्रल्हाद अण्णाराव केंद्रे (बाबुले) यांची सन २०१५मध्ये अमरावती पोलीस दलात निवड झाली. ते सध्या अमरावती शहर पोलीस दलात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत असून पोलीस दलात सेवा करत असतानाच त्यांनी उराशी बाळगलेले पीएसआय पदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अभ्यास केला. या जिद्दीच्या जोरावर त्यांनी अखेर पोलीस उपनिरीक्षक पद गाठले आहे.

त्यानंतर या गावातील पोलीस दलात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर नामदेव केदार यांची २०१४ मध्ये यवतमाळ पोलीस दलात पोलीस म्हणून निवड झाली होती. ते सध्या पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्य निभावत त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणून पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड मिळवली आहे.तिसरे पोलीस दत्ता हनुमंत केंद्रे उर्फ पाटील हे सन २०१६ पासून अमरावती येथे राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) मध्ये कार्यरत असून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाचे यश संपादन केले आहे.या गावातील चौथे पोलीस नामदेव गोपीनाथ कोळगीर यांची २०१६ मध्ये नागपूर शहर पोलीस दलात निवड झाली. ते सध्या नागपूर पोलीस दलात कार्यरत असून त्यांच्या चिकाटी आणि जिद्दीमुळे त्यांनीही पोलीस उपनिरीक्षक पदावर आपली छाप उमटवली

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande