अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त दाभड येथे विशेष नियोजन
नांदेड, 04 मे (हिं.स.) : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील श्री सत्यगणपती देवस्थानात मंगळवारी (ता. ५) मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. देवस्थानचे प्रशासक तथा
अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त दाभड येथे विशेष नियोजन


नांदेड, 04 मे (हिं.स.) : अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील श्री सत्यगणपती देवस्थानात मंगळवारी (ता. ५) मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.

देवस्थानचे प्रशासक तथा तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी भाविकांना शिस्तबद्ध दर्शनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अर्धापूर–नांदेड मार्गावरील हे देवस्थान ‘जागृत’ म्हणून ओळखले जाते. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे पास देण्यात येणार नसून सर्व भाविकांसाठी मोफत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा ठेवण्यात येणार असून, दर्शनानंतर भाविकांनी मंदिराच्या उजव्या बाजूने बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, चप्पल-बूट काढूनच रांगेत उभे राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगांमध्ये बॅरिकेड्स उभारण्यात येणार असून, मंदिर परिसरात विक्रेत्यांना दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande