उभ्या जीपवर कार धडकली, दोघे गंभीर जखमी
परभणी, 10 जून (हिं.स.)। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जीप वर कार धडकून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मानवतरोड–सेलू रस्त्यावरील इरळद पाटी जवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी, एम एच ४३ एजे ८५७९ क्रमांकाची कार सेलूकडून मानवतरोडकडे
उभ्या जीपवर कार धडकली, दोघे गंभीर जखमी -मानवत तालुक्याकील इरळदपाटी जवळील घटना


परभणी, 10 जून (हिं.स.)।

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जीप वर कार धडकून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मानवतरोड–सेलू रस्त्यावरील इरळद पाटी जवळ घडली. याबाबत अधिक माहिती अशी, एम एच ४३ एजे ८५७९ क्रमांकाची कार सेलूकडून मानवतरोडकडे येत होती. यावेळी सेलू रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदाराची अथवा सामान वाहून नेणारी एमएच २९ बी इ ५३८१ क्रमांकाची बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला उभी होती. पाठीमागून येणाऱ्या कारचालकाचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने बोलेरो जीपला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील सुरज निर्वळ रा. सोमठाणा व कैलास शिंदे रा. हत्तलवाडी ता. मानवत हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघात घडल्याचे लक्षात येताच तेथील पुरुषोत्तम भिसे यांनी १०८ नंबरला कॉल करून रुग्णवाहिका बोलाऊन घेतली. कारमध्ये डॉ. रेहान आणि रुग्णवाहिका चालक भानुदास बाराहाते हे अवघ्या पाच मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जखमींना रुग्णवाहिकेत टाकण्यासाठी सुनील सोळंके, अंगद मोरे, दिलीप सोळंके यांनी मदत केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande