
नांदेड, 10 जून (हिं.स.)।
आपल्या डोंबिवलीचा सुपुत्र यश प्रवीण महाजन याने पहिल्याच प्रयत्नात भारतीय वायूसेनेची (IAF) परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास-१ अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला. त्याच्या या देदीप्यमान कामगिरीने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. नांदेड येथील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.
यश हा लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासू आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि 'एचएएल' (HAL) मधील अप्रेंटिसशिपच्या बळावर त्याने वायूसेनेत भरती होण्याचा निर्धार केला. त्यानंतर वर्षभर खडतर तयारी करून तो AFCAT आणि SSB या दोन्ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर आता वायूसेनेच्या तांत्रिक शाखेमध्ये 'फ्लाईंग ऑफिसर' म्हणून त्याची निवड झाली आहे.
ध्येयासक्ती, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर यशने घेतलेली ही भरारी अत्यंत अभिमानास्पद आणि येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
यश, तुझं मनःपूर्वक अभिनंदन! पुढील प्रशिक्षण आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis