नांदेडमध्ये भाजपची महत्त्वपूर्ण बैठक; विधानपरिषद निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त
नांदेड, 10 जून (हिं.स.) : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण यांनी आज नांदेड दौरा करून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या सद्यस्थ
अ


नांदेड, 10 जून (हिं.स.) : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण यांनी आज नांदेड दौरा करून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान रवींद्र चव्हाण यांनी नांदेड विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच या निवडणुकीच्या माध्यमातून नांदेडच्या विकासाला अधिक गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीला आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, मराठवाडा समन्वयक तथा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, नांदेड उत्तर जिल्हा प्रभारी किरण पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांच्यासह महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर उपस्थित होते.

तसेच मनपा गटनेते ऍड. महेश कनकदंडे, माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, सुधाकरराव भोयर, मनपा स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, महानगर सरचिटणीस विजय येवनकर, शीतल खांडील, विजय गंभीरे, सुषमा थोरात, महेश खोमणे आणि दिलीप ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत संघटनात्मक तयारी, मतदारसंघातील रणनीती आणि प्रचार यंत्रणा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande