परभणी ते पंढरपूर 300 किमी सायकल वारीचे आयोजन; 20 सायकलस्वारांचा सहभाग
परभणी, 11 जून (हिं.स.)। प्रभावती डेली रायडर्स, परभणी यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त तिसर्या वर्षी परभणी ते पंढरपूर अशी 300 किलोमीटर सायकल वारी 10 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक ए
परभणी ते पंढरपूर 300 किमी सायकल वारीचे आयोजन; 20 सायकलस्वारांचा सहभाग


परभणी, 11 जून (हिं.स.)। प्रभावती डेली रायडर्स, परभणी यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त तिसर्या वर्षी परभणी ते पंढरपूर अशी 300 किलोमीटर सायकल वारी 10 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही सायकल वारी यंदाही उत्साहात पार पडणार असून शहरातील 20 सायकलस्वार यात सहभागी होणार आहेत.

वारीचे अध्यक्ष दीपक तळेकर, उपाध्यक्ष संदीप पवार, सचिव श्रीनिवास संगेवार, कोषाध्यक्ष राजेश्वर वासलवार यांच्यासह नीरज पारख, गिरीश जोशी, संकेत सराफ, शंकर फुटके, सर्वज्ञ पवार, राहुल सिरसेवाड, बालाजी तावरे, कल्याण देशमुख, सूर्यकांत सोनटक्के, अजय शर्मा, सुरेश गंधम, माणिक गरुड, विजय दुधाने, ओमकार भेडसूरकर, गंगाधर यादव आणि बालासाहेब मंडलिक आदींचा सहभाग राहणार आहे.

वारीचा प्रारंभ 10 जुलै रोजी पहाटे 4 वाजता परभणी येथून होणार आहे. पहिल्या दिवशी परळी-अंबाजोगाई मार्गे सुमारे 160 किलोमीटर सायकल प्रवास करून कळंब येथे मुक्काम करण्यात येणार आहे. त्यानंतर 11 जुलै रोजी पहाटे 4 वाजता कळंब येथून बार्शी मार्गे सुमारे 150 किलोमीटर अंतर पार करत वारकरी पंढरपूर येथे पोहोचणार आहेत. आषाढी वारीचा आध्यात्मिक आनंद सायकलद्वारे अनुभवू इच्छिणार्या माऊली भक्तांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी वारीचे अध्यक्ष दीपक तळेकर यांच्याशी 9823587999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande