मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दुसरा टप्पा सुरू; परभणीच्या युवकांना आवाहन
परभणी, 11 जून (हिं.स.) राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) सुरू असून या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 35 वर्ष वयोगटातील पूर
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दुसरा टप्पा सुरू; परभणीच्या युवकांना आवाहन


परभणी, 11 जून (हिं.स.) राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) सुरू असून या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

या योजनेअंतर्गत 18 ते 35 वर्ष वयोगटातील पूर्णवेळ शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण किंवा नोकरीत नसलेले युवक-युवती पात्र आहेत. महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या तसेच खाजगी आस्थापनांमध्ये 11 महिन्यांचे प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यात 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना ₹6,000, पदविका धारकांना ₹8,000 आणि पदवीधर उमेदवारांना ₹10,000 इतके मानधन मिळणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://www.cmykpy.mahaswayam.goc.in या पोर्टलवरील “Intern Login” टॅबवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार क्रमांकाशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून ओटीपीच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण केली जाते.

जिल्ह्यातील पात्र बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेत मोठ्या संख्येने नोंदणी करून प्रशिक्षणाची संधी घ्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande