बीडच्या ऐतिहासिक खजाना विहिरीच्या विकासासाठी आ. संदीप क्षीरसागर यांची पर्यटन मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
बीड, 11 जून (हिं.स.)। बीड शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या ५०० वर्षे जुन्या ''खजाना विहीर'' या पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान त्य
अ


बीड, 11 जून (हिं.स.)।

बीड शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या ५०० वर्षे जुन्या 'खजाना विहीर' या पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी खजाना विहीर परिसराचा कायापालट करण्यासाठी एक सविस्तर प्रस्ताव पर्यटन मंत्र्यांकडे सादर केला.

या प्रस्तावामध्ये ऐतिहासिक वास्तूच्या परिसराचा रस्ता विकास करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, सोन्यासारख्या वारशाला उजळून टाकण्यासाठी सोलार हायमास्ट दिव्यांची उभारणी करणे, तसेच संपूर्ण परिसराचे काँक्रीटीकरण आणि सुशोभीकरण करणे अशा विविध पायाभूत कामांचा समावेश आहे. बीडच्या या अद्भुत स्थापत्यकलेच्या वारशाचे जतन आणि संवर्धन करून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या वैभवाला नवी ओळख मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने आणि सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी या बैठकीनंतर व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande