धर्मादाय विभागाच्या कार्यालयीन भोजनासाठी आता सर्वत्र एकच वेळ
कोल्हापूर, 11 जून (हिं.स.)। धर्मादाय विभागाच्या कार्यालयातील मुंबई मुख्यालय तसेच पुणे येथील धर्मादाय कार्यालयाची भोजनाची वेळ दुपारी १.३० ते २ अशी आहे. मुंबई मुख्यालय, पुणे, कोल्हापूर तसेच अधिनस्त सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्
धर्मादाय विभागाच्या कार्यालयीन भोजनासाठी आता सर्वत्र एकच वेळ


कोल्हापूर, 11 जून (हिं.स.)। धर्मादाय विभागाच्या कार्यालयातील मुंबई मुख्यालय तसेच पुणे येथील धर्मादाय कार्यालयाची भोजनाची वेळ दुपारी १.३० ते २ अशी आहे. मुंबई मुख्यालय, पुणे, कोल्हापूर तसेच अधिनस्त सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या भोजनाच्या वेळेत तफावत असल्याने, महत्त्वाच्या कामकाजासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण करताना अडचणी निर्माण होत होत्या. मुंबई मुख्यालय, पुणे व अधिनस्त कार्यालयांकडून माहिती प्राप्त करून घेणे तसेच कोल्हापूर विभागातील माहिती संबंधित कार्यालयांना पाठविणे यामध्ये व्यत्यय येत होता.

शासन परिपत्रकात नमूद केलेली वेळ आणि विभागीय कार्यालयांची भोजनाची वेळ यामध्ये विसंगती दिसून येत होती. त्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता व समन्वय साधण्यासाठी या आदेशान्वये कोल्हापूर कार्यालय तसेच अधिनस्त सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या भोजनाची वेळ दुपारी १.३० ते २ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande