बूथ स्तरापर्यंत जागतिक योगा दीन साजरा करावा - केशव उपाध्ये
नाशिक, 11 जून (हिं.स.)। : बूथ स्तरापर्यंत जागतिक योगा दिन साजरा करावा व निरोगी जीवनाचा गुरु मंत्र घराघरापर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी केले.ते जागतिक योग दिनानिमित्त पूर्वतयारीच्या नाशिक मह
Global Yoga should be promoted


नाशिक, 11 जून (हिं.स.)। : बूथ स्तरापर्यंत जागतिक योगा दिन साजरा करावा व निरोगी जीवनाचा गुरु मंत्र घराघरापर्यंत पोहोचवावा असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी केले.ते जागतिक योग दिनानिमित्त पूर्वतयारीच्या नाशिक महानगर जिल्हा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या नियोजित संघटनात्मक बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये,माजी केंद्रीय मंत्री व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भारती पवार,प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकर, गोविंद बोरसे,नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील देसाई,रश्मी हिरे,ॲड.शाम बडोदे,नाना शिलेदार आदी उपस्थित होते.

नाशिक येथील भाजपा वसंतस्मृती कार्यालयात महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली असून आगामी २१ जून जागतिक योग दिना निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन व आढावा यावेळी घेण्यात आला केशव उपाध्ये यांनी मंडल निहाय आढावा घेतला.अध्यक्षांनी त्यानुसार योग दिनाचे पूर्वतयारीची माहिती सादर केली.शहरातील योग शिबिरासाठी उपयुक्त अशी मैदाने यांची नोंद करावी.योग दिनानिमित्त सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सामाजिक संस्थांची नोंद करावी. किंवा शिबिरांसाठी संबंधित अधिकारी किंवा सामाजिक संस्था त्यांच्याशी संवाद करावा योगा शिबिरांसाठी आवश्यक त्या बाबींचे योग्य प्रकारे नियोजन करावे असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच पावसाची शक्यता बघता जवळपासची समाज कार्यालय तसेच मंगल कार्यालय यांचीही पाहणी करून घेण्यात यावी व गरज पडल्यास पाऊस अदृश्य परिस्थितीत अशा मंगल कार्यालय किंवा समाजकार्यालयांचा योगा कार्यक्रमासाठी उपयोग होऊ शकतो का याचीही माहिती संकलित करावी असे ते म्हणाले माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने योगाचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आपणही कार्यकर्त्यांनी योग दिनानिमित्त जास्तीत जास्त नागरिकांना तसेच सामाजिक संस्थांना शैक्षणिक संस्थांना या जागतिक योगा दिनानिमित्त योगा कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे असे प्रतिपादन त्यांनी केले.

भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी आपल्या भाषणातून जागतिक योगा दिन बूथ लेवलपर्यंत साजरा करण्यासाठी आपण विविध आघाड्यांचे तसेच शहरातील १० मंडलांमध्ये योग दिन साजरा करण्यासाठी योग दिन नियोजन समितीची निर्मिती केली असल्याचे सांगितले.याप्रसंगी त्या त्या परिसरातील योग प्रेमी व योगशिक्षक यांना सामावून घेतले जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले. प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी योगाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला निरोगी व सुदृढ आयुष्य जगण्याचा गुरुमंत्र पोहोचणार आहे त्यासाठी योगा दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करावा असे ते म्हणाले व घराघरापर्यंत योगाचे महत्व पोहोचवावे असे ते म्हणाले. मंडल अध्यक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नगरसेवकमोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक बळकटीसह आगामी कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली.जागतिक योग दिन हा जनसहभागातून उत्साहात आणि व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन नाशिक महानगर सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन काशिनाथ नाना शिलेदार यांनी केले त्या बैठकीस शहरातील महानगर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मंडल पदाधिकारी विविध आघाडी व प्रकोष्ट नगरसेवक आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande