किरीट सोमय्याना एमआयएमचा विरोध म्हणजे राजकीय नैराश्याचे लक्षण – चेतन गावंडे
अमरावती, 11 जून (हिं.स.) माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्याला एमआयएम पक्षाने केलेला विरोध हा जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकारणाला प्राधान्य देणारा आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होऊ नये, प्रशासनाची जबाबदारी नि
किरीट सोमय्याना एमआयएमचा विरोध म्हणजे राजकीय नैराश्याचे लक्षण – चेतन गावंडे , सभागृह नेता , मनपा


अमरावती, 11 जून (हिं.स.)

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्याला एमआयएम पक्षाने केलेला विरोध हा जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकारणाला प्राधान्य देणारा आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होऊ नये, प्रशासनाची जबाबदारी निश्चित होऊ नये आणि जनतेसमोर वास्तव येऊ नये यासाठी हा विरोध करण्यात आला असल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया अमरावती मनपाचे सभागृह नेता चेतन गावंडे यांनी दिली आहे.एमआयएमकडे जनतेच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी कोणतेही ठोस काम नसल्यामुळे ते केवळ विरोधाचे राजकारण करत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याऐवजी जे लोक प्रश्न उपस्थित करतात त्यांनाच विरोध करण्याचे काम एमआयएम करत आहे. हा विरोध अमरावतीच्या जनतेचा नसून स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी सुरू असलेल्या धडपडीचा भाग आहे.माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जन्म मृत्यू दाखल्याची प्रशासनाकडून माहिती जाणून घेण्यासाठी भेट दिली होती. लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही लोकप्रतिनिधीला किंवा माजी लोकप्रतिनिधीला जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारालाच विरोध करणे म्हणजे लोकशाही मूल्यांचा अपमान आहे.एमआयएमने विकास कामाचा प्रश्न सोडविण्याऐवजी प्रत्येक विषयाला राजकीय रंग देण्याची सवय सोडावी. अमरावतीची जनता विकास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची अपेक्षा ठेवते, संघर्ष आणि दिशाभूल करणाऱ्या राजकारणाची नाही.भारतीय जनता पक्ष नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्यांना विरोध करून कोणीही सत्य दडपून ठेवू शकत नाही. अमरावतीची जनता सर्व पाहत आहे आणि योग्य वेळी अशा दुटप्पी राजकारणाला लोकशाही मार्गाने चोख उत्तर देईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande