
बीड, 11 जून (हिं.स.)।
अंबाजोगाई तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड यशस्वीरित्या पार पडली. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते अक्षय निवास येथे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व संचालकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी अध्यक्षपदी ॲड. जयसिंग चव्हाण आणि उपाध्यक्षपदी श्री. दिलीप गिते यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासह शेतकरी, सभासद आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी हे नवे नेतृत्व निश्चितच प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis