सचिन घायाळ कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव : शेतकरी, कामगारांना थकीत रक्कम मिळण्याची आशा
छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)। पैठण तालुक्यातील संत एकनाथ साखर कारखाना चालविणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या साखरसाठ्यासह जप्त मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी व कामगारांची थकीत देणी अदा करण्यासाठी साखर
सचिन घायाळ कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव : शेतकरी, कामगारांना थकीत रक्कम मिळण्याची आशा


छत्रपती संभाजीनगर, 13 जून (हिं.स.)।

पैठण तालुक्यातील संत एकनाथ साखर कारखाना चालविणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या साखरसाठ्यासह जप्त मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी व कामगारांची थकीत देणी अदा करण्यासाठी साखर आयुक्तांच्या आदेशानुसार विशेष लेखापरीक्षकांच्या पथकाने मालमत्तेचा पंचनामा करून ताबा घेतला. जप्त मालमत्तेमध्ये सुमारे ३,५०० क्विंटल साखर, २,००० टन मोलॅसेस आणि ४५० टायरगाड्यांचा समावेश आहे. कर्ज घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनीचे संचालक सचिन घायाळ अद्याप फरार आहेत. पुढील आठवड्यात लिलाव प्रक्रिया पार पडणार असून न्यायालयाच्या माध्यमातून शेतकरी व कामगारांना थकीत रक्कम वितरित केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande