
धाराशिव, 13 जून (हिं.स.)।
भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने आज तुळजापूर येथे तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
पक्षाचे निरीक्षक श्री. सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत निवडणुकीची रणनीती, नियोजन आणि महायुतीच्या विजयासाठी करावयाच्या प्रभावी कामकाजावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी एकदिलाने काम करून विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी आमदार श्री. अभिमन्यू पवार, श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. नितीन काळे, श्री. विनोद गंगणे, श्री. सुनील चव्हाण, श्री. सिद्धेश्वर कोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis