
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी संवाद
छत्रपती संभाजीनगर, 15 जून (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगर–जालना विधानपरिषद मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार, नगरसेवक आणि पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र (दादा) चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी महायुतीचे विविध घटक पक्षांचे नेते, आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत मतदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.
बैठकीदरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाठ यांच्या विजयासाठी प्रभावी नियोजन, संघटनात्मक समन्वय आणि प्रचार यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच निवडणुकीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांचा प्रचार करण्याचे आवाहन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी राज्यातील महायुती सरकारने राबविलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी सुहास शिरसाठ यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
महायुतीचा विजय म्हणजे विकासाचा विजय असा संदेश देत कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis